बोधकथा

*🤜झाकली मूठ सव्वालाखाची🤛*

            एकदा एका मंदिरात पूजेला एक राजा येणार आहे असे त्या पुजार्‍याला कळले... त्याने सहा हजार रुपयांचे कर्ज काढले आणि देऊळ चांगले सजवले रंगवले.

         राजा पूजेला आला  आणि त्याने दक्षिणा म्हणून चार आणे ठेवले पुजार्‍याला तिथेच घाम फुटला. आपण सहा हजार कर्ज काढून मंदीर रंगवले आणि राजाने फक्त चार आणे दक्षिणा ठेवली... आता या चवण्णीछाप राजाला अद्दल घडवायचीच.

         पुजारी हुशार होता... राजा गेल्यावर पुजार्‍याने ते चार आणे मुठीत घेतले आणि सगळ्यांना सांगू लागला...
"राजाने मंदिरात दान केलेली एक वस्तू आहे. ती मला झेपणार नाही. म्हणून मी तिचा लिलाव करतोय. आपापली बोली लावा."

आता राजाने वस्तू ठेवलीय म्हणल्यावर साधी ठेवली असेल का... ? पहिलीच बोली दहा हजार पासून... सुरु झाली. पुजारी डोके हालवूनच नाही परवडत असे म्हणत होता. लिलावातील बोली वाढत वाढत पन्नास हजारावर पोचली.

तिकडे राजाला पहारेकरी म्हणाला, "महाराज, पुजाऱ्याने आपण मंदीरात दान केलेल्या वस्तूचा लिलाव सुरु केला आहे आणि ती वस्तू तो दाखवतही नाही आणि सांगतही नाही, मुठीत ठेवलीय..."

राजाला घाम फुटला.  तो पळत पळत आला आणि पुजाऱ्याच्या डोक्यावरून हात फिरवून म्हणाला, "हे माझ्या बाप्पा, सव्वालाख देतो पण कुणाला ती वस्तू दाखवू नको...."

        तेव्हा पासून ही म्हण रुजू झाली....

*🤜....झाकली मूठ सव्वालाखाची....🤛
C&P

🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺

खरा शिष्य कोण- बोधकथा  मराठी

एकदा दोन तरुण स्वामी विवेकानंदांकडे गेले. त्यांना स्वामीजीचे शिष्य व्हायचे होते. तसे त्यांनी सांगितले. तरी स्वामीजी डोळे मिटून स्वस्थ बसले. दुसरे दिवशी तोच प्रकार – कंटाळले- पण एकजण स्वामीजीची रोज पूजा करे तर दूसरा त्यांना दोष देई, “तुमच्यात माणुसकी नाही, तुम्ही कठोर आहात”  वगैरे, पण दोघेही रोज येण्याचे थांबेनात. दोघांनाही वाटे आपणच त्यांचे शिष्य होण्यास योग्य आहे.
एकजण रोज पूजा करी. दूसरा दोष देई. एक दिवस नदीला पुर आला – पहिल्याने नाईलाजाने आपल्या काठावरच पूजा-स्तोत्र वगैरे कार्यक्रम केला. दोष देणारा मात्र पुरातून जाऊन स्वामीजीची निंदा करुण आला. असे तीन दिवस चालले. चौथ्या दिवसी पुर ओसरला. दोघेही गेले. स्वामीजीनी डोळे उघडले व शिव्या देण्या-याला शिष्य म्हणून स्वीकारले. ते म्हणाले, “शिव्या देण्यासाठी का होईना तो संकटावर मात करुण येतो. निष्ठा हवी. तामसी वृत्ती बदलता येइल. पण कच खाणारी निष्ठा शिष्याला अपात्र ठरविल” 
C&P
💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐

बोधकथा : कुणाला कमी समजू नये

प्रयाग (गया) येथे एक खूप चांगले पंडित राहत होते. एकदा नेपाळचे राजे सामान्य वेशात पंडितांमागे फिरू लागले, माझ्या आजोबांचे पिंडदान करून द्या, माझ्याजवळ काहीच पैसे नाहीत. थोडेसे लाडू भरून आणलेत तेच दक्षिणा म्हणून स्वीकार करून घ्या. जे लोभी पंडित होते त्यांना पैशाची हाव होती त्यांनी या सामान्य वेशातील राजांना नकार दिला. अशा वेळेस राजांना तेथील एक पंडित गाठ पडला. त्याला महाराजांनी पिंडदान करण्याची विनंती केली. त्याने ती कबूल केली. तो म्हणाला, भाऊ! पैशाची काही बाब नाही. मी पिंडदान करून देतो.

त्या पंडिताने फाटक्या तुटक्या कपडय़ात आलेल्या राजांचे पिंडदान पूर्ण करून दिले. यावर महाराज खूश झाले. त्या वेळेस ते त्याला म्हणाले, पंडितजी! या कार्यानंतर काही न काही दक्षिणा मी तुम्हास देणे लागतो. मी घरून काही लाडू आणले आहेत त्याचा तुम्ही स्वीकार करावा. मात्र या लाडूचे गाठोडे तुम्ही घरी जाऊन उघडावे. पंडित म्हणाले, बरं भाऊ, तुम्ही गरीब दिसता पण तुम्ही प्रेमाने दिलेल्या लाडूचा मी स्वीकार करतो. या नंतर पंडितास ते गाठोडे देऊन राजे निघून गेले. पंडिताने घरी जाऊन जेवायला बसायची तयारी केली. अचानक त्याला लाडूची आठवण झाली त्यावर त्याने ते गाठोडे सोडून पाहिले असता तो चकित झाला. कारण त्या गाठोडय़ात वीस सोन्याचे लाडू होते. 

तात्पर्य-कधीही कुणाला कमी समजू नये कारण कोणत्या रुपात कोण असेल याचा भरवसा नाही.
(C&P)
🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷

No comments:

Post a Comment