शिक्षकदिन 2022

आज जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा मामलदे येथे माजी सैनिक श्री. सुनिलभाऊ यांनी शाळेत येऊन आम्हा सर्वांना सुखद अनुभव दिला.शिक्षकांच्या कार्याची उतराई ही कधीच होवू शकत नाही परंतु त्यांच्या केलेल्या संस्काराची जाण आम्हाला सदैव आहे ही भावना व्यक्त करतांना आम्हा सर्व शिक्षक बंधु आणि भगिनींचा सत्कार त्यांनी केला.त्यांच्या समवेत गावातील शिक्षणप्रेमी श्री. शरददादा पाटील यांनी देखील सत्कार केला.खरच अजूनही शिक्षकांप्रती आदर ,प्रेमभाव कायम आहे हेच यातून सिध्द होते. आपण देशाची सेवा करत होता सुनिलभाऊ ,आणि आम्ही ज्ञानगंगेचे भगीरथ आहोत.
आज शिक्षक दिनाचे औचित्य साधून आमच्या इ ३रीच्या वर्गातील विद्यार्थी चि.यश शरद पाटील यांने केक कापुन आमच्यासोबत शिक्षक दिन साजरा केला. हे संस्कार असतात आणि अशाच छोट्या छोट्या गोष्टी तून जडणघडण होत असते.अतिशय शांत ,प्रेमळ ,मितभाषी असा आमचा यश ,शिक्षकांप्रती असलेला आदर कायम ठेवत आजचा दिवस तु खऱ्या अर्थाने अविस्मरणीय करुन टाकलास.आमचे शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री. शरददादा पाटील देखील या आनंदात सहभागी होण्यासाठी उपस्थित होते. शिक्षकांना या आनंदापुढे सर्व पुरस्कार छोटे वाटतात .

No comments:

Post a Comment