विज्ञान कोडी
लेखन - नंदा परदेशी
जि. प. शाळा बळसाणे जि. धुळे
१
मी आहे प्राणवायूचा साठा
अन्नधान्याची देतो रास
तोडू नका हो मला कोणी
उपयोगी पडतो मी हमखास
*उत्तर- वृक्ष/ वनस्पती /झाड*
२
स्वच्छ ठेवा हो तुम्ही मला
तहान तुमची भागवते
थांबत नाही कोठेच कधी
सतत मी वाहत असते
*उत्तर - नदी*
३
उंचच उंच बर्फाच्या राशी
देशाचे करतो सदैव रक्षण
वनौषधींचे आगर आहे
पर्यावरणाचे करतो संरक्षण
*उत्तर - हिमालय पर्वत*
४
दारोदारी लावतात तिला
समजली जाते खूप पवित्र
औषधी अशी सर्वगुणसंपन्न
आढळते ही भारतात सर्वत्र
*उत्तर - तुळस*
५
छाया पडते कधी चंद्राची
राहू , केतू ना दैवी खेळ
अंधश्रद्धा नको डोळस व्हा
विज्ञानाशी घाला याचा मेळ
*उत्तर - ग्रहण*
६
वनस्पती आहे इवलीशी
हात लावताच ती लाजते
स्पर्श करताच तिला जरासा
पाने आपली मिटवून घेते
*उत्तर - लाजाळूचे झाड*
७
ही एक क्रिया वनस्पतींची
सूर्यप्रकाश शोषून घेतात
पानांच्या साहाय्याने मग
अन्न आपले तयार करतात
*उत्तर - प्रकाश संश्लेषण*
८
हा आहे शेतक-यांचा मित्र
नागपंचमीला काढतात चित्र
पाय नसतात सरपटत जातो
जमीन तो भुसभुशीत करतो
*उत्तर - साप*
९
बेडूकराव जमिनीत झोपतात
आठ महिने तेथेच राहतात
सांगा मुलांनो या निद्रेला
विज्ञानप्रेमी काय म्हणतात?
*उत्तर - शीतसमाधी*
१०.
पोटात पाय ठेवते ती
हळूहळू ती सतत चालते
चिकट स्त्राव सोडत जाते
लहान मुलांना खूप आवडते
*उत्तर - गोगलगाय*
११.
आॅक्सीजन घेतो
रक्त शुद्ध करतो
सुक्ष्म वाहिन्यांद्वारे
शरीराला पोहचवितो
*उत्तर - ह्रदय*
१२
जन्म मरणाच्या चक्रामध्ये
आहे हा एक लहानसा शब्द
घेत राहिलो सदैव तर जगतो
बंद झाल्यास होतो निःशब्द
*उत्तर - श्वास*
१३
बत्तीस सैनिक तुटून पडतात
बारीक तुकड्यात पाणी मिसळते
एक महाराणी मात्र मजेत
आस्वाद त्यांचा आनंदाने घेते
*बत्तीस सैनिक - दात, पाणी - लाळ*
*महाराणी - जीभ*
१४
हा एक चमत्कारिक कागद
आम्ल अल्कलीत रंग बदलतो
पहा मुलांनो गंमत जवळून
जादूची हा कांडी फिरवतो
*लिटमस कागद*
१५.
रंग माझा लाल तांबडा
वाघ असो वा कोंबडा
प्रत्येक सजीवात राहतो
शरीराला मी उर्जा देतो
*उत्तर - रक्त*
१६.
लांबी याची खूप मोठी
म्हणतात याला लहान
नाव लहान असले तरी
कार्य याचे आहे महान
*उत्तर - लहान आतडे*
१७.
स्त्रिया पुजती पौणिर्मेला
प्राणवायूचा अखंड झरा
साधूसमान लांब दाढी
बहुपयोगी आहे हा खरा
*उत्तर - वडाचे झाड*
१८.
शरीरातील शूर शिपाई
करतो रोगापासून संरक्षण
उभी करूनी फौज त्याची
करतो आपले सदैव रक्षण
*उत्तर - पांढ-या पेशी*
१९.
डाळींमध्ये याचे अस्तित्व
दुधामध्येही असते सत्त्व
मजबूत करण्या शरीर ठेवण
याचे करावे दररोज सेवन
*उत्तर - प्रथिने*
२०
गवतासारखी पाने औषधी
चहात टाकून पितात
सर्दी खोकला तापाला
लगेच पळवून लावतात
*उत्तर - गवती चहा*
*विज्ञान कोडी*
२१
एका बाटलीत
रंग दोन
सांगा उत्तर
हुशार कोण?
उत्तर - अंडे
२२
सारखेच आम्ही
दोन भाऊ
उत्तर लवकर
सांगा पाहू
उत्तर - डोळे
२३
देतो ज्ञान शिकवतो विज्ञान
उंदीर असतो मदतीला
कोठेही न्या सोबत याला
सलाम याच्या शास्त्रज्ञाला
उत्तर - संगणक
२४
रात्रीचा दिवा आकाशात
चमचम चमकतो नभात
म्हणतात मला रजनीनाथ
देतो रात्रभर तुम्हा साथ
उत्तर- चंद्र
२५
सप्तरंग घेऊन हा
आकाशात अवतरतो
पृथ्वीवरील लोकांना
खूप खूप आवडतो
उत्तर - इंद्रधनुष्य
२६
ही एक वनस्पती
कीटकांना खाते
येता जवळ कीटक
गिळून आत घेते
उत्तर - हायड्रा
२७
एक प्राणी सरपटणारा
देतो तो अंडी
त्याला पाहताच आपली
सुटते घाबरगुंडी
उत्तर - साप
२८
मित्र म्हणती सारे याला
देतो चोहीकडे प्रकाश
उर्जा व उष्णतेचा स्त्रोत
घर आहे त्याचे आकाश
उत्तर - सूर्य
२९
वर फेेकलेली वस्तू य़ेते नेहमी खाली
प्रसिद्ध आहे हा न्यूटनचा शोध
काय म्हणतात सांगा मुलांनो
झाला का तुम्हाला बोध?
उत्तर - गुरुत्वाकर्षण
३०
पृथ्वीचा हा उपग्रह
आकाशात तो राहतो
आकार बदलून रात्रीला
आपल्याला प्रकाश देतो
उत्तर - चंद्र
३१
जलचर हा प्राणी
पाण्यात पोहतो
अन्न म्हणूनही
उपयोगी पडतो
उत्तर - मासा
३२
छोटेसे हे फळ
देते माणसाला बळ
फोडा याला पटकन
तोंडात टाका चटकन
उत्तर- अक्रोड
३३
जांभळा झगा अंगावर
हिरवी टोपी डोक्यावर
मिळेल तुम्हाला बाजारात
आणा मला तुमच्या घरात
उत्तर - जांभळी वांगी
३४
अंगात घालतो निळा अंगरखा
रुबाब माझा बादशहा जसा!
सौंदर्याने पाडतो भुरळ लोकांना
थुईथुई नाचतो नर्तक कसा?
उत्तर - मोर
३५
आम्रवृक्षावर बसून गातो
पक्षी हा मधुर आवाजात
अंडी कधी उबवत नाही
ठेवतो दुस-यांच्या घरट्यात
उत्तर - कोकीळ पक्षी
लेखक-नंदा परदेशी, धुळे
No comments:
Post a Comment