Wednesday, April 15, 2020

यशस्वी जीवनाचा मूलमंत्र

यशस्वी जीवनाचा मूलमंत्र


   " शिक्षण ”


शिक्षण म्हणजे काही पुस्तके वाचली, परिक्षा दिली व उत्तीर्ण झालो असे नव्हे. शिक्षणाचे खरे महत्त्व समाजात रुजलेच नाही. शिक्षण म्हणजे माणसाच्या जन्मापासुन मरणापर्यंत चाललेली शिकण्यची प्रक्रिया आहे. एकविसाव्या शतकातही आपल्याला कायद्याचा बडगा उगारून शिक्षणाचे महत्त्व सांगावे लागते, … यासाठी आपला समाजच कारणीभूत आहे. आपल्या प्रजासत्ताक राज्य घटनेला 70 वर्षे होत आली तरीही, शिक्षणाचे सार्वत्रिकरण, समान सामाजिक न्याय, समान संधी आणि समान नागरी कायदा ही मार्गदर्शक तत्त्वे घटनेच्या पुस्तकातच राहिली आहेत. निरनिराळे विकास कार्यक्रम राबविण्यासाठी आवश्यक असणारे प्रशिक्षित मनुष्यबळ वाढवून मानवी भांडवल निर्माण करण्याचे शिक्षण हे मुख्य साधन आहे.

ज्ञानसंवर्धन आणि बुद्धीमत्तेचा विकास करणे, जीवनातील नैतिक मूल्यांचे संगोपन आणि संवर्धन करणे, चारित्र्यसंपन्न व्यक्तीमत्त्व घडवणे या गोस्टी शिक्षणाने साध्य झाल्या, तरच त्याला खरे शिक्षण म्हणता येईल म्हणून प्राथमिक , माध्यमिक , उच्च माध्यमिक तसेच जीवनोपयोगी कौशल्ये विकसित करणारे शिक्षण सर्वांपर्यंत कसे पोहचेल याचा सर्वांनीच विचार करायला हवा कारण यशस्वी जीवनाचा मूलमंत्र ” शिक्षण” हेच आहे.

2 comments:

  1. छान आहे.काही नवीन गोष्टी पाहायला मिळाल्या ज्या मुलांना अभ्यासाची गोडी लावण्यास व त्यांच्यातील सुप्त कलागुण विकसीत करण्यास नक्कीच उपयुक्त ठरतील.

    ReplyDelete
  2. छान आहे.काही नवीन गोष्टी पाहायला मिळाल्या ज्या मुलांना अभ्यासाची गोडी लावण्यास व त्यांच्यातील सुप्त कलागुण विकसीत करण्यास नक्कीच उपयुक्त ठरतील.

    ReplyDelete