- Home
- बालगीते
- कार्यानुभव
- माझे वर्गातील उपक्रम
- रांगोळी
- ई साहित्य
- इंग्रजी सुविचार
- इंग्रजी परिपाठ
- शालेय उपक्रम
- शब्द डोंगर संग्रह
- डुडल आर्ट(चित्र संग्रह)
- ओरिगामी
- Html5 flip book
- चित्रांच्या योग्य जोड्या लावा
- बाल दोस्तांसाठी चित्र खजिना
- नंबर बघा ,चित्र रंगवा
- quilling art
- ठसा चित्र
- सीडी आर्ट
- बटन आर्ट
- स्व निर्मित ई साहित्य
- वर्णनात्मक नोंदीचे फोल्डर
- बाल मित्रांसाठी अभ्यास
- माझी कलाकृती
- वेळापत्रक (सर्व १ ते ४)
- बोधकथा
- गणपती कलाकृती
- आपला जिल्हा आपले उपक्रम भाग-2
- विविध कार्यशाळा pdf
- मी तयार केलेल्या google test(चाचण्या)
- ब्लॉग निर्मिती भाग १ ते ८
- आवडीचे पुस्तक वाचा
- कोरे प्रमाणपत्र/ट्रॉफी
- HD wallpapers
- Designer Alphabets(A to Z)
- आपला जिल्हा आपले उपक्रम भाग ३
- हसत खेळत शिका
- हा खेळ सावल्यांंचा(योग्य चित्र ओळखा)
- ओळख वाद्यांची(चित्र)
- चला वाचन क्षमता वाढवू या
- आपला जिल्हा आपले उपक्रम भाग-४
- प्राणी,पक्षी ,किटक चित्र
- इंग्रजी महिने,आठवड्याचे वार, ऋतू
- चित्र कार्ड(प्राणी,पक्षी,किटक-नावासह)
- वाहतुकीची साधने(नावासह ओळख)
- भाजीपाला ओळख(चित्र /नाव)
- ओळख फळांची(इंग्रजी नावासह)
- A to Z (small & capital Alphabets)
- रंगाची ओळख(इंग्रजी नावासह)
- माहिती सर्व प्रकारच्या पेहरावांची * स्त्री,पुरुष (इंग्रजी नावासह)
- भौमितिक आकार(इंग्रजी नावासह)
- उपयुक्त शैक्षणिक app
- ठिपके(dots) चित्र संग्रह(ई साहित्यासाठी उपयोग)
- म्हणी ओळखा,मिनाक्षीताई नागराळे(संकलन-सोनाली साळुंखे)
- देवासमोरील रांगोळ्या
- आषाढी एकादशी भव्य दिव्य वारी
- लोकमान्य टिळक पुण्यतिथी व अण्णाभाऊ साठे जयंती कार्यक्रम
- हसत खेळत ओळख रंगांची
- स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव
- जन्माष्टमी(दहीहंडी)
- सावित्रीबाई फुले जयंती
- वाचन प्रेरणा दिन ( हात धुवा दिन )
- डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती
- मिश्र भेळ(माझ्या वर्गातील उपक्रम)
- शाळा पुर्व तयारी मेळावा
- परिसर क्षेत्र भेट
- छत्रपती शिवाजी महाराज जयंती
- वर्गातील उपक्रम
- आषाढीची वारी (२०२३)
- विद्याप्रवेश कृतीपत्रिका
- चिमुकल्यांनी साकारलेले बाप्पा
- अनोखी संगीत खुर्ची
Friday, August 20, 2021
सर फाऊंंडेशन जळगाव
*सर फाउंडेशन जळगाव आयोजित देशभक्तीपर समुह नृत्य स्पर्धेचे बक्षीस व जिल्हास्तरीय नारीशक्ती सन्मान २०२१ या पुरस्काराचे वितरण .....*
[ जळगाव प्रतिनिधी - निलेश पाटील सर ]
जळगांव - दि.१९/८/२०२१ गुरुवार रोजी सर फाऊंडेशन जळगांव आयोजित २६ जानेवारी - प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने देशभक्तीपर समुह नृत्य स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा व जिल्हास्तरीय नारीशक्ती पुरस्कार वितरण सोहळा किड्स गुरुकुल इंग्लिश मिडीयम स्कूल जळगाव येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी निरंतर शिक्षण विभाग जळगांव शिक्षणाधिकारी आदरणीय डॉ.डी.एम.देवांग साहेब होते. कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून म्हणून मा. शिक्षण विस्तार अधिकारी तथा उपशिक्षणाधिकारी, जळगांव आदरणीय विजय पवार साहेब, सर फाऊंडेशन सोलापूर जिल्हा समन्वयक आदरणीय राजकिरण चव्हाण सर यांची प्रमुख उपस्थिती लाभली.
सदर कार्यक्रमाचे प्रायोजकत्व मा. प्रविण आत्माराम पाटील सर पाचोरा ( उपाध्यक्ष, महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ जळगांव ) यांनी केले. आदरणीय प्रविण पाटील सरांनी सर्व विजेत्या स्पर्धकांना स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्रे स्वखर्चाने उपलब्ध करून दिली. सर्वप्रथम ईशस्तवन व स्वागतगीत सौ.काळवीट मॅडम यांनी सादर केले. त्यानंतर अध्यक्ष निवड करण्यात आली. मा.अध्यक्ष व प्रमुख अतिथी तसेच जिल्हा समन्वयक यांच्या शुभहस्ते दीप प्रज्वलन व नटराज पूजन करण्यात आले.
सर्वप्रथम अध्यक्ष व सर्व मान्यवरांचा पुस्तक व बुके देऊन सन्मान करण्यात आला. सत्कार सोहळ्यानंतर कार्यक्रमाचे प्रास्ताविक आदरणीय सुनिता पाटील मॅडम, महिला जिल्हा समन्वयक जळगाव यांनी केले. त्यानंतर जिल्हा समन्वयक आदरणीय निलेश शेळके सर यांनी सर फाऊंडेशन च्या कार्याची माहिती सर्वांना दिली.यानंतर प्रथम क्रमांक प्राप्त शाळांमधील विद्यार्थ्यांची सुंदर नृत्ये सादर झाली. शिक्षक गटातून प्रथम क्रमांक प्राप्त शिक्षकांनी देखील बहारदार नृत्य सादर करून उपस्थितांची वाहवा मिळवली. सर्व स्पर्धक व त्यांच्या मार्गदर्शक शिक्षकांचा सत्कार प्रमाणपत्र, गुच्छ व ट्रॉफी देऊन करण्यात आला.
मान्यवरांच्या हस्ते नृत्य स्पर्धेतील विजेता विद्यार्थी - विद्यार्थीनीं व मार्गदर्शकांचे प्रमाणपत्र ट्रॉफी देऊन गौरव करण्यात आला. यामध्ये *वयोगट 6 ते 12 प्राथमिक गट*
१) *प्रथम क्रमांक* जिल्हा परिषद केंद्रशाळा गोंडगाव ता भडगाव जि जळगाव
२) *द्वितीय क्रमांक* जि. प.शाळा कोथळी ता मुक्ताईनगर जि जळगाव
३) *तृतीय क्रमांक*(विभागून देण्यात आला आहे)
*1) जिल्हा परिषद प्राथमिक मराठी मुलीची शाळा लोहारा ता पाचोरा*
*२)जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बहादरपूर ता पारोळा*
४) *उतेजनार्थ १* जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तारखेडा ता पाचोरा जि जळगाव
५) *उतेजनार्थ २* जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चिंचपुरे ता पाचोरा
*वयोगट १३ ते १८ माध्यमिक गट*
१) *प्रथम क्रमांक* कुऱ्हाड ता पाचोरा जि जळगाव
२) *दुसरा क्रमांक* भरत विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय न्हावी ता यावल
३) *तृतीय क्रमांक* डॉ जे जे पंडित माध्यमिक विद्यालय लोहारा ता पाचोरा
४) *उतेजनार्थ १* आण्णासो एस.आर पाटील माध्यमिक विद्यालय मामलदे.तालुका चोपडा जि.जळगाव
५) *उतेजनार्थ २* जिल्हा उच्च प्राथमिक शाळा गोराडखेडा ता पाचोरा
*मोठा गट विशेष पुरस्कार*
हिंडा कास्तीलीनो मराठी हायस्कूल .कांदिवली पश्चिम
*शिक्षक गट प्राथमिक व माध्यमिक*
१) *प्रथम क्रमांक*
पंचायत समिती पाचोरा शिक्षिका गट
२) *द्वितीय क्रमांक*
सौ.कामिनी पंकज चव्हाण
जिल्हा परिषद मुलांची शाळा आव्हाने ता जळगाव
३) *तृतीय क्रमांक*
ज्योती वानखेडे मॅडम
जी.प.शाळा ओझर खेडे तालुका भुसावळ जि जळगाव
*4).उतेजनार्थ* १. श्रीमती क्षमा साळी..आणि टीम एरंडोल शिक्षिका.
*5)उतेजणार्थ* २.श्रीमती वर्षा वाल्मिक पाटील/ शिंदेआणि टीम..
जि प उच्च प्राथमिक शाळा गरताड ता.चोपडा जि.जळगाव
त्यानंतर नारीशक्ती पुरस्काराचे वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. ८ मार्च २०२१ या जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून *आठ भगिनींना जिल्हास्तरीय नारीशक्ती सन्मान २०२१ या पुरस्काराने* गौरविण्यात आले. विशेष महत्वाची बाब म्हणजे स्पर्धेत सहभाग घेणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याला व त्यांच्या मार्गदर्शक शिक्षकाला देखील सहभाग प्रमाणपत्रे देण्यात आली.
कार्यक्रमासाठी सुंदर रांगोळी रेखाटणाऱ्या व नृत्यात सहभाग नोंदविणाऱ्या आदरणीय सुवर्णा महाजन मॅडम यांनी विजेत्यांमधून प्रातिनिधिक मनोगत व्यक्त केले.त्यानंतर मान्यवरांची मनोगते झाली. मनोगत व्यक्त करताना मा. श्री राजकिरण चव्हाण सर ( जिल्हा समन्वयक सोलापूर ) यांनी कार्यक्रमाच्या आयोजन , नियोजनाबद्दल समाधान व्यक्त केले. तसेच सर फाऊंडेशनच्या भारतभरातील विस्ताराची, शिक्षक व विद्यार्थ्यांना प्रेरित करण्याची यशोगाथा सांगताना जळगाव जिल्ह्यातील शिक्षक व विद्यार्थ्यांकडूनही भरीव कामगिरीची अपेक्षा व्यक्त केली.कार्यक्रमाचे प्रायोजक आदरणीय प्रविण आत्माराम पाटील सर यांनी कार्यक्रमाबाबत समाधान व्यक्त केले. तसेच भविष्यातही सर फाऊंडेशनच्या प्रत्येक विधायक कार्यात शिक्षकांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याची ग्वाही दिली.
उपशिक्षणाधिकारी आदरणीय विजय पवार साहेब यांनी सर फाऊंडेशन करत असलेल्या कार्याची प्रशंसा केली व भविष्यात कोणतीही मदत लागल्यास ती नक्की करू असे आश्वासन दिले. शिक्षकांनी आपले काम निष्ठेने केल्यास त्यांना नक्कीच शाबासकीची थाप मिळते असे त्यांनी सांगितले. अध्यक्षीय भाषणात आदरणीय डॉ. देवांग साहेब यांनी सर्व यशस्वी स्पर्धकांचे, सुंदर नृत्य करणाऱ्या शिक्षिका भगिनींचे कौतुक केले. आदरणीय साहेबांनी निवृत्तीनंतरही सर फाऊंडेशनच्या कार्याला पूर्णवेळ देणार असल्याचे सांगितले. नारीशक्ती पुरस्कार मिळालेल्या सर्व आठही भगिनींचे अभिनंदन केले.
यानंतर आदरणीय अरुणा उदावंत मॅडम (जिल्हा समन्वयक जळगाव) यांनी कार्यक्रमाला मोलाचे सहाय्य करणाऱ्या प्रत्येक घटकाचे आभार मानले.
संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री.प्रविण पाटील सर व सौ.जयश्री काळवीट मॅडम यांनी केले.
चविष्ट अल्पोपहारानंतर आदरणीय श्री राजकिरण चव्हाण सर (सोलापूर जिल्हा समन्वयक) यांनी सर्व तालुका समन्वयक यांच्याशी संवाद साधून पुढील ध्येय धोरणे निश्चित केली.
या समारंभासाठी सर फाउंडेशन चे पाचोरा तालुका समन्वयक विलास निकम सर, यावल तालुका समन्वयक - निलेश धर्मराज पाटील सर, मुक्ताईनगर तालुका समन्वयक सुनिल बडगुजर सर, विलास पाटील,उज्वला महाजन, अनिल वराडे, सुनील दाभाडे, मनीषा सूर्यवंशी, जगदीश बियाणी, भूषण महाले, छाया इसे, मंगल म्हेत्रे, अनिल माळी, सोनाली साळुंखे, अमित डूडवे, क्षमा साळी, कल्पना चौधरी, स्वाती बडगुजर, विजय पाटील, श्रीमती वंदना नेहेते, जयश्री काळवीट, समाधान जाधव, जगदीश पाटील, मीरा पाटील -जंगले, प्रवीण पाटील, सीमा पाटील, प्रेमचंद अहिरराव, ध्रुवास राठोड, मनीषा पाटील,
भाईदास सोमवंशी व जळगाव जिल्ह्यातील सर्व तालुक्यांची समन्वयक यांनी परिश्रम घेतले. एक वेगळीच प्रेरणा घेऊन कार्यक्रमाच्या मधुर स्मृती मनात घोळवत सर्वजण एका नवीन ध्येयाने प्रेरित होऊन घरी गेले.
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment